श्री गजानन महाराजांचा दर्शनासाठी काढा ऑनलाईन पास इथून

0
5646
Google search engine
Google search engine

 

 

http://gajananmaharaj.org:8080/

१. श्री भक्तांना दर्शनाकरीता मास्क / दुपट्टा / गमछा असणे आवश्यक आहे.

२. हार, फुले, प्रसाद, नारळ इत्यादी सोबत आणू नये.

३. प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंग करून घ्यावी.

४. पादत्राने स्वतःचे वाहनातच ठेवावीत किंवा ठरवून दिलेल्या रॅकवर स्वतःचे जबाबदारीवर ठेवावी.

५. प्रवेश द्वाराजवळ हात सॅनिटाईज करून घ्यावेत.

६. मूर्ति व ग्रंथांना स्पर्श करु नये.

७. श्री मंदिरातील घंटांना स्पर्श करु नये किंवा वाजवू नये.

८. स्वतःचे सुरक्षेकरिता मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप जतन करुन घ्यावी.

९. प्रसाद, तिर्थ, विभूति घेण्याचा आग्रह करु नये.

१०. १० वर्षाच्या आतील व ६० वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांना श्रींचे दर्शनाकरिता प्रवेश शाशनाचे नियमानुसार देता येणार नाही.

११. श्रींचे दर्शनाकरीता एक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करुन घ्यावी. ( त्याकरीता नेट कॅफे, सेतू, स्मार्ट फोन व स्थानिक बुथवर सुद्धा व्यवस्था उपलब्ध आहे.)

१२. दैनंदिन निश्चित केलेल्या संख्येनुसार भक्तांना श्रींचे दर्शनाकरीता प्रवेश दिल्या जाईल.

१३. श्रींचे दर्शनास जात असतांना आजूबाजूला असलेल्या रॅलिंग / भिंतीला स्पर्श करु नये.

१४. कृपया रेड झोन व कंटेन्मेंट झोन मधील भक्तांना शाशन निर्देशानुसार श्रींचे दर्शनाकरीता प्रवेश दिल्या जाणार नाही.