सोमठाणा गावकऱ्यांना माणुसकीच्या भिंतीचा आधार…. “आधार”ची आदिवासी बांधवान सोबत दिवाळी

0
510
Google search engine
Google search engine

राम म्हैसने मित्र परिवाराच्या वतीने कपडे व फराळ वाटप

अकोटःसंतोष विणके

आधार युवा संकल्प प्रतिष्ठान व राम म्हैसने मित्र परिवाराने आदिवासी ग्राम सोमठाणा येथे आदिवासी बांधवांन सोबत दिवाळी साजरी केली. प्रतिष्ठानच्या अकोट मधील माणुसकीची भिंत उपक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कपडे भेट दिले. हेच कपडे व शेकडो नागरिकांना दीपावलीचे भेट म्हणून दिले. सोमठाणा गावकऱ्यांना माणुसकीच्या भिंतीच्या निमित्ताने आधार युवा संकल्प प्रतिष्ठान ने आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. अश्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आकोट शहरांमध्ये माणुसकीची भिंत सामाजिक उपक्रम आधार युवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम म्हैसने यांनी सुरू केला आहे. या मदत केंद्रात गोळा झालेली कपडे स्वच्छ धुऊन व प्रेस करून ती गरजू नागरिकांना सोमठाणा येथे वितरित करण्यात आले. सोबतच फराळ वाटप करण्यात आले. . तत्पुर्वी या गावातील शाळेच्या आवारात बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम पार पडलायावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर कपडे व फराळाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमास अकोट शहरातील विविध मान्यवरांचे सहकार्य लाभले.सरपंच प्रणाली बिजेकार, पूजा पवार, संजय बिजेकर, मावजीलाल कास्‍देकर, वैभव नायसे, अश्विन हिंगणकर, यांनी मदत केली. या वेळी आधार युवा संकल्प प्रतिष्ठान चे कार्यकर्ते वेळी उपस्थित होेते.