जिल्हाधिकाऱ्यांची शाळांना भेट व पाहणी* *विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचावासाठी शाळांनी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करा* *-शैलेश नवाल यांचे निर्देश*

0
530
????????????????????????????????????
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 23 : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर आज प्रथमच जिल्ह्यांतील शाळा उघडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संक्रमनापासून बचावासाठी, त्यांचे आरोग्य जोपासण्यासाठी शाळांनी हात धुन्यासाठी साबन, मास्क, सॅनिटॉयझर, थर्मल स्कॅनर, सामाजिक अंतराचे पालन आदी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुविधा शाळेत तत्पर ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज काही शाळांना भेट दिली व तेथील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाधिकारी व शाळांचे शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, लॉकडाऊनच्या कालावधीत गत आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. पंरतु राज्य शासनाच्या निर्णयानुसार तसेच जिल्हा प्रशासनाच्या जबाबदारीवर नववी ते बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून शाळा सुरु करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आज जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने विद्याथ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना व सुविधा शाळेत तत्परतेने तयार ठेवाव्यात. विद्यार्थ्यांना हात धुन्यासाठी साबुन, सॅनिटायझर, मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन आदी उपाय सुरळीतपणे करावे. दोन विद्यार्थ्यांनमध्ये तीन फुटापेक्षा जास्त अंतरासाठी एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा. विद्यार्थ्यांनीही आपापसात बोलतांना सामाजिक अंतराचे भान ठेवावे. जे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत आले नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन पध्दतीने नियमितपणे शिक्षण सुरुच ठेवण्यात यावेत. विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शाळांनी जाणीवपूर्वक पूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन व इतर माध्यमांचा वापर करुन विद्यार्थ्यांकडून करुन घ्यावा, असे आदेश त्यांनी शाळेतील शिक्षकवृंद यांना दिले.

खूप दिवसानंतर शाळा सुरु झाल्यामुळे तुम्हाला कसे वाटत आहेत, शाळा बंदीच्या काळात आपण काय केले, मुख्यत: तुमचा अभ्यास कसा केला, कुठे बाहेर फिरायला गेलात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल, शाळा सुरु करण्याविषयी त्यांच्या पालकांचे काय म्हणने आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोबत संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

0000