एच जी इन्फ्रा कंपनीच्या अधिकारी कंत्राटदारांना आमदार देवेंद्र भुयार यांनी धरले धारेवर – अमरावती पांढुरणा महामार्गावरील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे दिले निर्देश !

0
1352
Google search engine
Google search engine

 

वरुड तालुका प्रतिनिधी :
अमरावती पांढुरणा महामार्गावरील एच जी इन्फ्रा कंपनी मार्फत सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरील शहरातील व ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईट, महामार्गावरील १०० मीटर अप्रोच रोड काढणे , अपूर्ण असलेले पुलांचे बांधकाम, विविध ठिकाणी रोड ला खड्डे पडले असून महामार्गावरील विविध अपूर्ण असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून त्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाले असून अनेकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागत आहे. या संदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांची बैठक घेऊन अपूर्ण असलेल्या कामांमुळे व कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे अमरावती पांढुरणा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण न केल्यास एच जी इन्फ्रा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास दोषी अधिकारी आणि कंपनीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगून अमरावती पांढुरणा महामार्गावरील अप्रोच रोड , स्ट्रीट लाईट, अपूर्ण पुलांचे काम, महामार्गावरील पडलेले खड्डे, यासह आदी अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
या बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, निखिल बनसोड, ऋषिकेश राऊत, संदीप खडसे, अजय चोरडे, निलेश मगर्दे, बांधकाम विभागाचे अभियंता वाघ, दाभाडे, महावितरण कंपनीचे अधिकारी , कंत्राटदार यांच्यासह आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.