संग्रामसिंह देशमुख व जितेंद्र पवार यांचा विजय निश्चित :- माजी मंत्री सदाभाऊ खोत

0
495
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव

वध

शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरी जाऊन भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांची भूमिका समजावून सांगावी. पुणे पदवीधर मतदारसंघ पारंपारिक भारतीय जनता पक्षाचा असल्याने मतदारसंघांमध्ये भाजपाचा उमेदवार निश्चित निवडून येईल यामध्ये कसलीही शंका नाही तथापी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य पदवीधर व शिक्षक उमेदवारांना देऊन त्यांना विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
ते पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शिराळा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा केंद्रनिहाय संयुक्त दौरा भेटीदरम्यान बोलत होते. यावेळ महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य
सम्राट महाडिक,जि.प चे सभापती जगन्नाथ माळी
कामेरीचे माजी सरपंच जयराज पाटील ,जि.प सदस्य निजाम मुलाणी,पं.स.सदस्य मारुती खोत प्रमुख उपस्थित होते.
सम्राट महाडिक म्हणाले की, संग्राम देशमुख हे खऱ्या अर्थाने पदवीधरांना न्याय देण्याचे काम करतील. सध्या पाचही जिल्ह्यातील पदवीधरांची पसंती ही त्यांनाच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांचा विजय निश्चित झाला आहे. जास्तीतजास्त मतदान कार्यकर्त्यांनी मतदान करून घ्यावे असे आवाहन सम्राट महाडिक यांनी केले.

यावेळी डॉ.सचिन पाटील,भानुदास मोटे, विनायक जाधव, पी.आर.पाटील, सचिन पाटील, रहीमशा फकीर, जालिंदर जाधव,बाळासो जाधव, बाळासो बावडे,शहाजी पाटील,विजय पाटील,भिकाजी तोडकर,ॲड.संदीप पाटील,पै.किरण पाटील,राजाभाऊ गुरव,विठ्ठल गडकरी,संग्राम गोइंगडे,हर्षवर्धन दादा पाटील,रघुनाथ पवार,संदीप चव्हाण,तुकाराम खटावकर,राहुल काळुगडे,जालिंदर जाधव,भगवान पाटील,दीपक पडळकर,ओंकार तोडकर,अर्जुन सूर्यवंशी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.