*अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*

146

*अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*

*चोरीचा गुन्हा उघड, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या टीम ची कार्यवाही

अमरावती :-

दि.15/11/2020 रोजी पो.स्टे. परतवाड़ा हद्दीमधील बस स्टॉप जवळील बंसल साड़ी दुकाना मधून एकूण 10 कट्टे ज्यामधे 50 नग साड़ी किं 50,000/-₹ असा माल चोरीस गेला असल्याने पो.स्टे. परतवाड़ा येथे अप.क्रं.448/2020 कलम 380 भा. द. वि. प्रमाणे दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपासकरीत असतांना आज दि. 26/11/2020 रोजी नमूद विधि संघर्षित बालक यास ताब्यातुन घेऊन बारकाइने विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली, नमूद विधि संघर्षित बालक याचे ताब्यातून चोरीस गेलेल्या साड्यां पैकी एकूण 31 नग साड्या किं. अंदाजे 31,000/-₹ चा माल हस्तगत करण्यात आला आहे, विधि संघर्षित बालक व जप्त मुद्देमाल सह पोलीस स्टेशन परतवाड़ा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
*सदरची कार्यवाही मा. डॉ. हरि बालाजी एन. पोलीस अधीक्षक, अम. ग्रा.  व मा. श्याम घुगे अपर पोलीस अधीक्षक, अम. ग्रा. यांचे मार्गदर्शनखाली व पो.नि. श्री तपन कोल्हे साहेब यांचे नेतृत्वात स.पो.नि. गोपाल उपाध्याय  यांनी केली आहे.*