अकोट-अकोला रस्त्यासाठी छावा संघटनेचे अनोखे आंदोलन

0
1081
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

अकोट-अकोला राष्ट्रीय महामार्ग गेल्या ३ वर्षापासुन अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामाचे सुस्त ठेकेदार व अधिकारी यांच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने तांदुळवाडी फाटा येथे होम हवन करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.
अकोट अकोला रस्ता खोदुन ठेवल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावर धुळीचे साम्राज्य व दगडांचा खच यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे‌‌.दुचाकी चालकांना मणक्याचे त्रास वाढत आहेत.तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने त्वरित लक्ष घालुन रस्त्याचे काम सुरू करण्याची सद्बुद्धी मिळावी करिता छावा संघटनेच्या वतीने होम हवन करणात आले.यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.शंकरराव वाकोडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा संपर्कप्रमुख निवॄत्ती पाटिल वानखडे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक प्रविण बानेरकर,जिल्हा सचिव परिक्षित बोचे, तालुकाप्रमुख अॕड.सुशिल खवले,तेल्हारा तालुकाप्रमुख उमेश कुकडे, उपतालुकाप्रमुख गणेश इंगळे,अकोट तालुका सल्लागार गोकुळ पानझाडे, उपतालुकाप्रमुख अरविंद बानेरकर,ज्ञानेश्वर पाटिल मानकर,धनराज गावंडे,निखिल रोडे,आशिष नागापुरे,विवेक इंगळे,दिलीप भगत,सुधाकर गडम,बजरंग बघे,अभिजित कडु,ओम चवरे, गजानन कडु,ज्ञानेश्वर रोडे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.