*राशन दुकान मध्ये धान्य वाटप मध्ये घोळ गोविंदपुर येथील घटना,तालुक्यातील इतरही दुकानची व्हावि तपासणी

0
677
Google search engine
Google search engine

*राशन दुकान मध्ये धान्य वाटप मध्ये घोळ
गोविंदपुर येथील घटना,तालुक्यातील इतरही दुकानची व्हावि तपासणी

चांदुर बाजार :-

तालुक्यातील गोविंदपूर येथील रास्त भाव दुकानात धान्य वितरनात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याने तेथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद मोतीराम धामडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांचे कार्यालयात लेखी तक्रार दिली.जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राचे अनुषंगाने तालुका पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख यांनी गावातील ग्रामपंचायत मध्ये बसून एकूण 88 शिधापत्रिका धारक यांचे बयान घेतले तपासात अनेक सदोष प्रकरण पुढे आले.

कोरोणा चा प्रसार होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आधार प्रमाणीकरण सवलत देण्यात आली.याचा गैरफायदा घेत प्राधान्य गटाच्या लभार्धीचा पावत्या न देताच धान्य वाटप करण्यात आले.तपासाअंती नियमित धान्य वाटपात गहू 33.69 क्लिंटल,तांदूळ 42.20 क्कि, साखर 1.96 क्की,तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील गहू 6.12 क्कि,तांदूळ 7.48 क्किंटल,चणाडाळ 18 किलो, इतका मोठ्या प्रमाणात अपहार व दुकानात पुस्तकात शिल्लक व प्रत्यक्ष धान्य साठा या मध्ये गहू 20 किलो व तांदूळ 25 किलो इतका कमी असल्याचे आढळून आले.तपासणीत व लभार्धी यांचे बायाना वरून त्यांना आता पर्यंत कमी दिलेले व नियमित मोफत योजनेचे धान्य ,साखर , डाळ विचारात घेता दुकानात एकूण 40.01 क्किंतल गहू,49.93 क्कींतल तांदूळ,1.96 क्लिंटल साखर ,18 किलो चणाडाळ इतक्या. मोठ्या प्रमाणात धान्य वाटपात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले.

स्वस्त धान्य दुकान प्राधिकरण पत्र धारक विजय ओंकरराव सूताने यांचे कडून अपहारीत धान्याची बाजार भावाने वसुली करून प्राधीकार पत्र (परवाना) रद्द करणे बाबत चा अहवाल तालुका पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख यांनी दिला असून सदर प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांचे कडे वर्ग करण्यात यावे असा अहवाल तहसीलदार धीरज स्थूल यांच्ये कडे सुपूर्द करण्यात आला असल्याचे त्यांनि सांगितले.

चौकट:-
चांदुर बाजार तालुक्यातील अनेक राशन दुकान दार यांनी ग्राहक याना कोरोना चे कारण सांगून पावती दिली नाही.काहीतरी पावती मशीन च्या बाहेर काढतच नाही त्यामुळे अश्या सर्व दुकान यांची तपासणी करण्याची मागणी तालुक्यातील इतर गावातील नागरिक यांच्या कडून होते आहे.

फोटो:- बयान घेताना तालुका पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख