मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळयात, तर पसार होण्याचा प्रयत्न फसला पोलिसांची सावधगिरी ची भूमिका, आरोपी ताब्यात चांदुर बाजार:-

0
1301
Google search engine
Google search engine

मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळयात, तर पसार होण्याचा प्रयत्न फसला
पोलिसांची सावधगिरी ची भूमिका, आरोपी ताब्यात

चांदुर बाजार:-

तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या ताब्यातून आरोपी ने पळून जाण्याचा प्रयत्न केला असून ठाणेदार दीपक वळवी यांच्या सावधगिरी मुळे आरोपीचा प्रयत्न फसला आणि पुन्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र या घटनेमुळे अनेक चर्चला उधाण परिसरात आले आहे.

तालुक्यातील वाढत्या मोटरसायकल चोरी च्या गुन्हा वाढ होत असताना ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी आरोपी निलेश जयराम कासदेकर वय 20 रा सावलमेंढा तालुका भैसेदेही म प्रदेश याला मोटरसायकल चोरी करण्याच्या प्रयत्न करीत असताना तक्रार वरून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने अंजनगाव सुर्जी येथून मोटरसायकल चोरली असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे आणखी चोरी गेलेल्या मोटरसायकल तपास करण्यासाठी आरोपी ला ताब्यात घेतले.मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस स्टेशन परिसरातून आरोपीने पोलिसांना चकमा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सावध भूमिकेमुळे त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपी विरोधात ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन ला भादवी 379,511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच न्यायालयाने आरोपींला 29 ला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती.

प्रतिक्रिया:-
सदर आरोपी हा मोटरसायकल चोरी करण्याच्या प्रयत्न करताना पकडण्यात आला तसेच त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली जी त्याने अंजनगाव सुर्जी येथून चोरली होती.न्यायालयात हजर करून परत पोलीस स्टेशन आल्या नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र लगेच त्याला ताब्यात घेण्यात आले.
दीपक वळवी ठाणेदार ब्राम्हणवाडा थडी