शहर वाहतूक शाखेची ऑटो चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू, पहिल्याच दिवशी जवळपास 40 ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये लावले

0
496
Google search engine
Google search engine

अकोलाःप्रतिनिधी

शहरात जवळपास सर्व प्रमुख मार्गावर रस्त्यांची विकास कामे सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करतांना वाहतूक कर्मचाऱ्यांची धावपळ होते, त्यात अकोला शहराच्या क्षमतेच्या पाच पट ऑटो शहरात धावतात,त्या मुळे शहरात वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होतो, ह्या साठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वेळोवेळी ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले परंतु ऑटो चालकां मध्ये सुधारणा दिसून न आल्यामुळे आज पासून त्यांचे विरुद्ध कारवाईचा बडगा पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी मोहीम सुरु केली.

कागदपत्रे जवळ न बाळगणारे व दंड न भरणारे ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्याची कारवाई सुरू करून एकाच दिवसात 40 ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये लावून प्रलंबित दंड भरून घेऊन व कागदपत्रे दाखविल्या नंतरच त्यांना सोडण्यात आले, आज एकाच दिवशी ऑटो चालकां कडून 58,000 चा दंड वसूल करण्यात आला, ही मोहीम संपूर्ण महिनाभर सुरूच राहणार असून ऑटो चालकांनी त्यांचे कडे प्रलंबित असलेला दंड भरावा तसेच वाहतूक नियमांचे पालन करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही ह्या बाबत दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांचा ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये लावण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे