अकोट अकोला मार्गासाठी ढोल बजाव आंदोलन

0
389
Google search engine
Google search engine

आकोटःप्रतिनिधी

अकोट-अकोला रस्ता कामासाठी सरपंच संघटना व राष्ट्रवादी युवक कांग्रेसने सोमवारी ढोल बजाओ आंदोलन केले. गेल्या कीत्येक महीन्यांपासुन खोदुन ठेवलेला अकोट अकोला मार्ग हा वाहनधारकांना सह आजारी रुग्णसाठी मृत्यूमार्ग ठरतो आहे. वाहनधारकांना या खोदून ठेवलेल्या मार्गाने मंत्र्यांचा त्रास होतोय तर गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे धुळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असूनअकोट अकोला मार्ग हा अकोट व परिसरातील गावांसाठी जिल्हा मुख्यालयाला जोडणारा असल्याने या मार्गाच्या वाताहतीवर जनतेची तीव्र नाराजी आहे. तसेच अकोट अकोला ब्रॉडगेज मार्ग देखील बंद असल्याने अकोल्याला जाण्याकरता फक्त रस्ता मार्गावर वाहतूक अवलंबून असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.