इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पालकांनी यावर्षाची फिस निम्मी भरावी-दादा कांबळे!

0
628
Google search engine
Google search engine

इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पालकांनी यावर्षाची फिस निम्मी भरावी-दादा कांबळे

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद – दिनांक १४डिसेंबर कोरोणा संकटाच्या काळात यावर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळा गेल्या साडेआठ महिन्यापासून बंद आहे .आणखीनही प्राथमिक चे वर्ग बंद आहेत तशातच शाळा पालकांकडून फिस वसुलीचा तगादा लावला आहे व संपूर्ण एक वर्षाची फीस शाळा मागत आहे व घेत आहेत,वास्तविक शाळेची फिस आकारणी शाळेची लायब्ररी फिस,कंप्यूटर फिस,शिकवणी फिस,क्रींडा फिस,शाळेची मेंटेनेस फिस,असे अनेक खर्च धरून फिस आकारली जाते पण यावर्षी कोरोणा मुळे सर्व जिल्ह्यांतील शाळा बंद आहेत मग विद्यार्थी शाळेतच आले नाही तर लायब्ररी खर्च, कंप्यूटर खर्च, शिकवणी खर्च, शाळेचा मेंटेनन्स खर्च, क्रीडा खर्च व असे अनेक खर्च पालकांनी कशामुळे भरायचे ? ऑनलाइनच्या नावाखाली पालकांची लुट केली जात आहे ऑनलाइन शिक्षण फक्त ३०% विद्यार्थी यांना शाळेने दिले आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना फिस मुळे ऑनलाइन शिक्षण दिले गेले नाही जिथे दिले तिथे फक्त एक ते दोन शिक्षकांच्या मदतीने शिक्षण देत आहेत मग संपूर्ण एक वर्षाची फिस पालकांकडून का घेतली जात आहे ? तरी अशा शाळेवर शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केले नाही,मनसेने यापूर्वी सतत पाठपुरावा करून शाळेच्या तक्रारी शिक्षण विभागात देऊन देखील काहीच कारवाई केली नाही म्हणून आज दिनांक १४-डिसेंबर राजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे व इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील फिस कमी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, तरी माझी सर्व इंग्रजी माध्यमाच्या पालकांना विनंती आहे की आपण शाळेची निम्मीच फिस भरावी किंवा भरु नये तसेच शाळा फिससाठी दमदाटी करत असेल तर शिक्षण विभाग जिल्हा परिषद मध्ये शाळेची तक्रार दाखल करावी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांचाशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केले आहे..