आकोटमध्ये शिवसैनिकांचे इंधन दरवाढ व खा. दानवेंविरुद्ध निषेध आंदोलन

0
629
Google search engine
Google search engine

खा.दानवेंच्या प्रतिमेची गाढवावरून मिरवणुक

आकोटः खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्य व केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात शिवाजी चौक येथे शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे याच्या प्रतीमेची गाढवावरुन मिरवणुक काढली व तसेच गॅस व पेट्रोलच्या कीमंतीत वाढ झाल्याचा निषेध केला.आकोला शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुकेश मुरुमकर व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी आपल्या मनोगतातुन निषेध व्यक्त केला

.हे आंदोलन खा. अरविद सावंत सर्पक प्रमुख प्रकाश शिरवाडकर आ. नितीन देशमुख आ. गोपीकिशन बाजोरीया व मा.आ. संजय गावंडे याच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शाम गावंडे शहर प्रमूख सुनिल रंदे, विजय ढेपे.जि.प सदस्य डाॅ प्रशांत अढाउ, रोशन पर्वतकार विजय अंभोरे,दिपक रेखाते विलास ठाकरे,सोपान साबळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे गोपाल कावरे कुणाल कुलट नितीन काकड रनजीत कहार कमल भास्कर विजय भारसाकळे व असंख्य शिवसैनीक आजी माजी पदाधीकारि यांची उपस्थीती होती.