चार पोलीस स्टेशनमध्ये अवैध धंदे चा पूर,पोलीस विभागाची संमती? वरिष्ठ यांनी दखल घेऊन कार्यवाही ची मागणी चांदुर बाजार :-

0
890
Google search engine
Google search engine

 

चार पोलीस स्टेशनमध्ये अवैध धंदे चा पूर,पोलीस विभागाची संमती?
वरिष्ठ यांनी दखल घेऊन कार्यवाही ची मागणी

चांदुर बाजार :-

                             तालुक्यातील शिरजगाव कसबा,करजगाव देऊरवादा घाटलाडकी ,चांदुर बाजार शिरजगाव बंड ते परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत.ब्राम्हणवाडा थडी,शिरजगाव कसबा ,आसेगाव,चांदुर बाजार पोलीस स्टेधन हद्दीत देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. या अवैध धंद्यांना राजकीय पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा असल्याने परिसरातील बीट अंमलदाराची बदली करण्याची मागणी जोर धरत आहे.

            तालुक्यातील चांदुर बाजार,ब्राम्हणवाडा थडी,आसेगाव शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत.मात्र पोलीस आंधळय़ाची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे केले जात आहेत. दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे बिट अंमलदारांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस बिट अंमलदारांकडून तक्रारदारांनाच धमकावले जाते.

            शहरात जवळपास पाच ते सहा मटका बुकीचालक आहेत. त्यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. दोन-तीन वर्षापूर्वी मटका व्यवसाय काहीसा कमी झाला होता, मात्र तो पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, आहे.दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. तसेच शहरात गुन्हेगारी घटना घडत आहेत; मात्र तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे कागदावर गुन्हे कमी दिसत आहेत, मात्र याला आळा बसणे गरजेचे असल्याने चांदुर बाजार तालुका परिसरातील नागरिक यांचे मत आहे.

कारवाईची गरज!

शहरातील सर्वसामान्य नागरिकांतदेखील असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे पोलिसांनी गुळमुळीत धोरण स्वीकारून चालणार नाही. पोलीस ठाण्यातील वाढत चाललेला राजकीय हस्तक्षेप कमी करून सत्यासोबत असल्याचे पोलिसांना दाखवून देण्याची गरज आहे.

तालुक्यात राजकीय लोकांच्या जवळील व्यक्तीचे अवैध धंदे.

तालुक्यातील परिसरात राजकीय व्यक्तीं  च्या जवळच्या लोकांचे अवैध व्यवसाय असल्याने पोलिसांना कारवाई करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. बिनबोभाट दारू विक्री सुरू आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू तस्करी,आणि गुटखा विक्री हा चारही पोलीस स्टेशन हद्दीतील चर्चेचा विषय आहे.

फोटो मेल केला आहे.