*स्थानिक गुन्हे शाखेची चांदुरात गांजा वर कार्यवाही* स्थानिक पोलिसांच्या कार्यवाही वर प्रश्नचिन्ह?

0
461
Google search engine
Google search engine

*स्थानिक गुन्हे शाखेची चांदुरात गांजा वर कार्यवाही*

स्थानिक पोलिसांच्या कार्यवाही वर प्रश्नचिन्ह?

चांदुर बाजार:-

                             दी.18/12/2020 रोजी पोलीस स्टेशन *चांदूर बाजार*  हद्दीत गोपनीय माहितीवरून नाका-बंदी केली असता आरोपी हे आपल्या दोन मोटरसायकलवर गांजाची वाहतूक करताना मिळून आले वरून त्याचे ताब्यातून (1) दोन मोटर सायकल किंमत अंदाजे६०,००० (२) एकूण 46किलो 300 ग्रॅम गांजा की. अंदाजे ५५५८४०/-रू असा एकूण ६१५८४० रू. चा मुद्देमाल मिळून आला.यास जप्त मुद्देमालासह  पोलीस स्टेशन  चांदूर बाजार यांचे  ताब्यात देण्यात आले.

या कार्यवाही मध्ये आरोपी नामे -1) *सुरज अविनाश शेळके उर्फ सुरू  वय ४०वर्ष राहणार  चांदूर बाजार
2) जावेद अली मिराली वय तीस वर्ष राहणार कसाब पुरा चांदूरबाजार,3) शेख वसीम शेख करीम वय 27 वर्ष राहणार अन्सार नगर अमरावती,4) कृष्णा रामदास गोंड वय 22 वर्ष ,5) दीपक अर्जुन नेमाडे वय तीस वर्ष दोन्ही 4 व 5 राहणार कुहरा काकडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव याना ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचेपो.नि तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे  पोलीस हेड कॉस्टबल मनोज सुनील ,नाईक पोलीस कॉस्टबल अजमत सैययद , स्वप्निल तवर Npc रवींद्र बावणे,पोलीस कॉस्टबल पंकज फाटे  यांनी केली.

चौकट :-
चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या या कार्यवाही मुळे स्थानिक पोलीस बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी राहिलेले ठाणेदार यांची चांदुर बाजार ला पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली तरी स्थानिक पोलीस यावर कार्यवाही का करू शकली नाही.हा प्रश्न चर्चेत आहे.