संत्रा नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजपा चे तहसीलदार यांना निवेदन अतिवृष्टी तसेच गारपीट नुकसानभरपाई मिळावी

0
573
Google search engine
Google search engine

संत्रा नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजपा चे तहसीलदार यांना निवेदन
अतिवृष्टी तसेच गारपीट नुकसानभरपाई मिळावी

चांदुर बाजार:-

भारतीय जनता पार्टी किसान आघाडी तर्फे चांदुर बाजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी या करीता निवेदन देण्यात आले.
शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार दिवाळी आधी 2020 च्या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत्त देणार असे म्हटले होते, परंतु आज पर्यंत चांदुर बाजार तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही, बाजूच्या वरुड / मोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांना राज्यपाल जाहीर 2019 ची नुकसान भरपाई मिळत असून आपल्या तालुक्यात का नाही असा सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी केला,अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तालुक्यात झाले तरीही अजून पर्यंत कोणतीच मदत जाहीर नं होने या सरकार च्या केलेल्या घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे, म्हणून भाजपा किसान आघाडी आंदोलनात्मक पवित्रा घेईल असे निवेदन मा. तहसीलदार याना निवेदन देण्यात आले.
या वेळी उपस्थित मध्ये तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, सरचिटणीस गोपाल तिरमारे, रावसाहेब गुलक्षे, नन्दुभाऊ मडघे, अशोकराव गणोरकर, मिलिंद गणोरकर, प्रशांत अढाऊकर, सुरेंद्र मेहरे, देवेंद्र वांगे, निलेश देशमुख, बाळासाहेब खासबागे, अनिल अढाऊकर, अक्षय रडके, विशाल सोळंके, गजानन सोळंके, गोलू चव्हाण, अविनाश अंबाळकर, शुभम गणोरकर आणि शेतकरी उपस्थित होते..