गुप्तधन जादुटोन्याच्या खोडसाळपणाच्या प्रकाराने खळबळ… अकोट तालुक्यातील कुटासा येथील घटना

0
819
Google search engine
Google search engine

खोडसाळपणातुन भिती व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

आकोटःसंतोष विणके

तालुक्यातील कुटासा येथे शेतशिवारामध्ये जाणाऱ्या रेल रस्त्याच्या मध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तधनाच्या लालसेने जादूटोण्याचा खोडसाळपणा केल्याचा प्रकार दि.१८ रोजी उघडकीस आला हा प्रकार गावाबाहेर शेत रस्त्यांवर केल्याने शेतांमध्ये पिकांच्या चोऱ्या होऊ नये म्हणून भिती घालण्याचे उद्देशाने केल्याचीही चर्चा या निमित्ताने गावात होती.कुटास्यातील शिवारातील रस्त्यांवर काहींना जमिनीवर हळद-कुंकू लाल कपडा हे एका फडक्यात बांधून जमिनीत गाडलेले दिसले. हा प्रकार गावकर्‍यांना दिसताच लगेच त्यांनी पोलीस पाटील यांना सांगितला असता त्यांनी काही जणांच्या समोर अधिक खोदून पाहिले असता लाल कपडा हळद कुंकू निंबु एका मडक्यावर होते.तर अधिक खोदले असता मडक्यात मुंगुसासारखा मृत प्राणी असल्याचे उपस्थितांना दिसले

हा प्रकार गुप्तधनाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याची वार्ता क्षणात गावात वार्‍यासारखी पसरली तर काहींना हा प्रकार भिती निर्माण करण्यासाठी मुद्दामहुन केला असल्याचे वाटत होते.एकंदरीतच जादुटोणा गुप्तधन आदी अघोरी प्रकारांबाबतीतील या प्रकाराने गावात चांगलीच खळबळ उडाल्याने अनेकांची दातखीळी बसली होती.