गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या क्षतिग्रस्त पुलाची स्वखर्चातून दुरुस्ती

0
364
Google search engine
Google search engine

प्रतिष्ठान व गजानन ग्रुपच्या विशाल भगत यांचा पुढाकार

आकोटः शहरातील दर्शनाकरीता जाणाऱ्या भाविकांना ज्या पुलावरुन जावे लागते तो पुल क्षतिग्रस्त झाला होता. विराट प्रतिष्ठान व गजानन ग्रुपच्या विशाल भगत यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही अपघात न व्हावा म्हणून स्वखर्चातून पुलाची दुरुस्ती केली. या ठीकाणी क्षतीग्रस्त पुलामुळे अनेक अपघात घडत होते. गजानन नगर हनुमान नगर व इतर परिसरातील नागरिकांचा याच पुलावरून रहदारी मार्ग आहे.नागरिकांच्या जिवाला या शेती ग्रस्त पुरामुळे धोका निर्माण न व्हावा कुठलाही अपघात न व्हावा म्हणून विराट प्रतिष्ठानचे विशाल भगत यांनी स्वखर्चाने हा पूल दुरुस्त करून नगर प्रशासनासमोर सजग नागरिकत्वाचे उदाहरण ठेवत नगर प्रशासनाने किमान धार्मिक स्थळांच्या विकास कामांकडे लक्ष वेधले