RTO CAMP प्रादेशिक परिवहन विभागाव्दारे तालुकास्तरीय मासिक शिबिराचे आयोजन

0
1816
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 23 : अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत जानेवारी ते जून महिन्यात तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कर स्वीकारणे, शिकाऊ उमेदवार अनुज्ञप्ती, वाहनाची अनुज्ञप्तीची चाचणी (जड वाहने वगळून), कंडक्टर लायसन्स चाचणी, नवीन वाहन नोंदणी इत्यादी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. सदर शिबिरात संबंधित तालुक्यातील रहिवाशी नागरिकांचीच कामे करण्यात येणार आहे. या संधीचा तालुक्यातील जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

तालुकानिहाय नियुक्त केलेल्या मोटार वाहन निरीक्षकांनी शिबिर कार्यालयाच्या कामासह त्या भागातील वाहन कर न भरलेली वाहने, वापरात नसलेल्या वाहनांची चौकशी व तपासणी करण्याचे आदेशित केले आहे. तसेच शिबिरात केलेल्या वाहनांच्या कामांची कागदपत्रे, फॉर्मस्, सर्व प्रकारच्या नोंदवह्याची नोंद आदी कामे पूर्ण करुन त्या संबंधिचा अहवाल सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत.

तालुकास्तरीय शिबिराची तारीख, तालुका, महिना आदी तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दर्यापूर तालुक्यासाठी 1 जानेवारी 2021, 2 फेब्रुवारी, 2 मार्च, 5 एप्रिल, 3 मे व 2 जून रोजी शिबिराचे आयोजन होणार आहे. वरुड तालुक्यासाठी 4 व 18 जानेवारी, 4 व 15 फेब्रुवारी, 4 व 18 मार्च, 6 व 19 एप्रिल, 5 व 18 मे, 4 व 16 जून रोजी, मोर्शीसाठी 6 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 8 मार्च, 8 एप्रिल, 7 मे, 7 जून रोजी, तिवसा तालुक्यात 8 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 10 मार्च, 9 एप्रिल, 10 मे, 8 जून, परतवाडा तालुक्यात 11 व 21 जानेवारी, 9 व 18 फेब्रुवारी, 12 व 22 मार्च, 12 व 23 एप्रिल, 11 व 21 मे, 10 व 21 जून, धामनगाव रेल्वेसाठी 13 जानेवारी, 11 फेब्रुवारी, 15 मार्च, 15 एप्रिल, 13 मे, 11 जून, धारणी (हरीसाल) साठी 15 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 16 मार्च, 16 एप्रिल, 17 मे, 14 जून, अजंनगाव सुर्जी 19 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 19 मार्च, 22 एप्रिल, 20 मे व 18 जून, चांदूररेल्वेसाठी 22 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 24 मार्च, 26 एप्रिल, 24 मे व 23 जून, चांदूर बाजारसाठी 25 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 26 मार्च, 27 एप्रिल, 25 मे व 25 जून, नांदगाव खंडेश्वरसाठी 27 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 30 मार्च, 29 एप्रिल, 27 मे व 28 जून, चिखलदरा तालुक्यासाठी 29 जानेवारी, 26 फेब्रुवारी, 31 मार्च, 30 एप्रिल, 28 मे व 30 जून रोजी शिबीर होणार आहेत.

उपरोक्त तालुकास्तरीय शिबिराच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास तो कॅम्प दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. तसेच धारणी येथे नेट कनेक्टीविटी उपलब्ध नसल्यामुळे तेथील शिबिर कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात हरिसाल (डिजीटल व्हीलेज) येथे पुढील आदेशापर्यंत घेण्यात येईल. तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

0000