अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा प्रभार विलास पाटील यांच्याकडे

0
606
Google search engine
Google search engine

आकोटः उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या कडे अकोट शहर पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. विलास पाटील यांनी याआधी जिल्हा पोलिस दलात वेगवेगळ्या अधिकारीपदावर आपला कार्याचा ठसा उमटवला आहे याआधी त्यांनी शहर वाहतूक शाखा सिटी कोतवाली पोलिस स्टेशन व उरळ पोलीस स्टेशन येथे आपली सेवा दिली असून आता त्यांच्याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष शाखेचे प्रमुख म्हणून जबाबदारी आहे.तसेच अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा व शहर ठाणेदार पदाचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे विलास पाटील यांनी आज अकोट येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा व शहर ठाणेदार पदाचा प्रभार घेतला. यानिमित्त शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले