चांदूर रेल्वेच्या मानसी पनपालिया ची कॅलिफोर्निया येथील ऑक्टा कंपनी निवड, शहराचा मान उंचावला

0
824
Google search engine
Google search engine

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले अभिनंदन

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे येथील रहिवासी असलेले मनिष पनपालिया यांची कन्या मानसी पनपालिया हिची नुकतीच कॅलिफोर्निया येथील ऑक्टा कंपनीत कॅम्पस मुलाखतीद्वारा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी मानसी पनपालिया हिचे त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन केले आहे. चांदूर रेल्वे शहरातील मानसीने एक मोठी झेप घेऊन शहराचा मान उंचावल्याची भावना विश्वकर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

चांदूर रेल्वे शहरात अनेक गुणवान युवक – युवती आहेत. अनेकांनी शहराचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. अमेरिकेतील अॅरिझोना युनिव्हर्सिटी येथे एम.एस.चे शिक्षण घेतलेली मानसी पनपालीया सुरूवातीपासूनच गुणवान असल्याने तिला परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. आता शिक्षण सुरू असतांनाच कॅम्पस मुलाखतीतून थेट कॅलिफोर्निया येथील ऑक्टा या जागतिक स्तरावरील नामवंत कंपनीत तिची निवड झाली आहे. चांदूर रेल्वे शहराचे नाव या निमित्ताने सातसमुद्रापार गेले आहे. मानसीच्या या निवडीबद्दल निलेश विश्वकर्मा यांनी पनपालिया यांच्या निवसस्थानी जाऊन मानसीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. तसेच मानसीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. चांदूर शहरातून अशाच पद्धतीने गुणवंताची जडणघडण व्हावी तसेच येथील तरूणांनी जागतिक स्तरावर आपले नाव कोरावे अशी अपेक्षा विश्वकर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

मानसीचे अभिनंदन करतेवेळी वडील मनिष पनपालीया, आई सुनिता पनपालीया, आजी जसोमती पनपालीया यांसह रोशन जालान, निलेश खात्री, सुनील सोनीने, श्रीकांत भोयर, केशव केने, प्रशांत बोबडे तसेच जय हिंद क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि निलेश विश्वकर्मा मित्रमंडळींची उपस्थिती होती.