भरधाव ट्रकने अल्टो कारसह चार ऑटो उडविले अमरावती मार्गावरील  घटना

0
4295
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे:

भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक चालवून अल्टो कारला कट मारला.त्यामूळे अल्टो कार मांजरखेड कसबा येथील बसस्टॅड उभे असलेल्या चार ऑटोवर जाऊन आदळल्याची घटना चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर मांजरखेड कसबा गावाजवळ सोमवारी सकाळी ९.१५ वाजता घडली.ट्रक व अल्टोकार दोघेही वर्धेकडे चालले होते.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही,मात्र अल्टोकारसह चार ऑटोचे मोठं नुकसान झाले आहे.
पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अमरावती येथून ट्रक (एमएच ०६एक्यु १९८०) हे वर्धेकडे निघाला होता.ट्रक चालकाने अत्यंत निष्काळजीपणे व भरधाव वेगाने आपले वाहन चालवून वर्धेकडे जाणारी अल्टो कार(एमएच १९ एएक्स ६१४३) ला मांजरखेड कसबा गावाजवळ कट मारला.त्यामूळे अल्टो कार मांजरखेड कसबा बस स्टँडवर उभे असलेल्या ऑटोवर जाऊन आढळली. त्यामूळे कारसह चार ऑटोचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही; मात्र अल्टोचे ४० हजाराचे नुकसान झाले.ऑटो क्र.१(एमएच२७ पी ५४६२)चे ४० हजाराचे नुकसान झाले.तसेच ऑटो क्र.२(एमएच २७ एडब्ल्यु ४६९८) चे ३० हजार, ऑटो क्र.३(एमएच२७पी९९८०) चे ३० हजार आणि ऑटो क्र.४ (एमएच२७सी४१०६) चे ५ हजार असे एकुण १ लाख ४५ हजार रूपयाचे मोठे नुकसान झाले.चांदूर रेल्वे पोलिसांनी ट्रक चालक आरोपी रमेश नथ्थुजी डोंगरे(६२)रा.टाकळी जहांगीर याला अटक करून भादंवी कलम-२७९, ४२७  अन्वये गुन्हा दाखल. तसेच घटनेचा पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास धोंडे करीत आहे.