दापोरी येथील आरोग्य उपकेंद्र ईमारत बांधकामासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर ! 

0
1009
Google search engine
Google search engine
दापोरी येथील आरोग्य उपकेंद्र ईमारत बांधकामासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने दापोरी वासीयांना मिळाला दिलासा !
दापोरी येथील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असल्यामुळे दापोरी येथील व परीसारतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दापोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याकरिता माजी महिला बाल कल्याण सभापती सौ. वृषालीताई विघे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे दापोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरात मिळाली.
दापोरी येथील प्राथमिक  उपकेंद्राला मंजुरात मिळाल्यापासून त्यावर ईमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्यावर मागील ५ वर्षाच्या काळामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्यामुळे दापोरी येथील आरोग्य उपकेंद्राचे काम थंड बसत्यात राहिले.
      आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा केल्यामुळे दापोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवीन ईमारत बांधकाम करण्याकरिता ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे दापोरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दापोरी आणि परिसरातील गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी दापोरी येथे आरोग्य उपकेंद्र गरजेचे होते. या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार देवेंद्र भुयार यांनी दापोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा करिता नवीन ईमारत बांधकामासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी सुविधा निर्माण होणार आहे.
       दापोरी येथील ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे दापोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन ईमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे १३ मार्च रोजी बैठक घेऊन मोर्शी तालुक्यातील दापोरी, येरला, वरुड तालुक्यातील सवंगा जमगाव (ख) , जमगाव (म) , तिवासाघाट येथील मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवीन ईमारत बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दापोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवीन ईमारत बांधकाम करण्याकरिता ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्यामुळे  दापोरी येथील आरोग्य उपकेंद्रामुळे जवळपासच्या गावांना आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
        दापोरी येथे उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून आमदार देवेंद्र भुयार,  यांच्या माध्यमातून या मागणीसह अनेक मागण्या मंजूर करून घेणार असल्याचे ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी सांगितले. आमदार देवेंद्र भुयार हे लोकनेते असून त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावत आहेत. आमदार देवेंद्र भुयार मोर्शी विधानसभा मतदार संघातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागत असल्याची चर्चा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी दापोरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवीन ईमारत बांधकाम करणे करीता ६० लक्ष रु निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दापोरी येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार, माजी महिला बाल कल्याण सभापती वृषालीताई विघे, जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे यांचे आभार मानले.
मोर्शी वरुड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी मी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत १३ मार्च रोजी बैठक घेऊन मोर्शी तालुक्यातील दापोरी , येरला, वरुड तालुक्यातील सवंगा जमगाव (ख), जमगाव (म), तिवासाघाट, येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्याच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यानुसार प्रशासकीय मंजुरात मिळाली असल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना नवीन ईमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बैठक घेऊन केली होती त्यानुसार  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, जिल्हाधिकारी यांना दिल्यामुळे दापोरी, येरला येथील आरोग्य उपकेंद्राला नवीन ईमारत बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध झाला असून मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कृती आराखडा बनविला आहे. —– आमदार देवेंद्र भुयार