शहर वाहतूक शाखेने दिले रस्ता सुरक्षा पथकाच्या ( आर एस पी) विद्यार्थाना सुरक्षेचे धडे…विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

0
461
Google search engine
Google search engine

अकोलाःरस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून आज शहर वाहतूक शाखे तर्फे अकोला शहरातील रस्ता सुरक्षा पथकाचे( आर एस पी) चे विद्यार्थाना फक्त मार्गदर्शन न करता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रत्यक्ष अकोला शहरातील गजबजलेल्या चौकात नेऊन वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण कसे करतात हे दाखवून वाहतूक पोलीस त्यांचे सोबत देऊन त्यांचे कडून वाहतूक नियंत्रण करवून घेतले।

आज सकाळी अकोला शहरातील न्यू इंग्लिश स्कुल व डी आर पाटील विद्यालयातील रस्ता सुरक्षा पथकातील जवळपास 50 विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेत बोलावून प्रथम त्यांना रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती देऊन रस्ते अपघात कमी करण्यासाठी फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नसून वाहन चालकांची मानसिकता बदलणे गरजेचे असून ही मानसिकता बदलण्यासाठी आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे,

स्वतः, आपले कुटुंबीय व मित्र ह्यांना सुरक्षित वाहतुकी साठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व समजावून सांगून मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले, नुसते मार्गदर्शन करून न थांबता आर एस पी च्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अकोल्यातील गजबजलेल्या नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका, टॉवर चौक ह्या चौकात नेऊन प्रथम वाहतूक शाखेकडे असलेल्या इंटरसेप्टर वाहन वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या वाहनांवर कशी कारवाई करते

, मद्य प्राशन केलेल्या, गडद काचे असलेल्या चारचाकी वर कशी कारवाई केल्या जाते त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वाहतूक अंमलदार पंकज महाळानकार, ज्ञानेश्वर वारांनकार, ह्यांनी करून दाखविले तसेच प्रत्यक्ष वाहतुक नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले, आर एस पी चे विद्यार्थी उपलब्ध करून देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कुल चे शिक्षक थुटे सर, रत्नपारखी सर तसे डी आर पाटील विद्यालयाचे शिक्षक नांदूरकर सर ह्यांचे सहकार्य मिळाले,

अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आर एस पी च्या विद्यार्थ्यांना सदर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला  मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये  उत्साह दिसून आला।