नेहरू युवा केंद्रामार्फत समाजकार्याची संधी _युवा स्वयंसेवकांची निवड करणार_ :- महिन्याला मिळणार 5000 मानधन

0
1516
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ५ : युवकांमध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जेचा उपयोग रचनात्मक व विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने युवकांचे नेटवर्क तयार करून त्यांचे सक्षम नेतृत्व स्वीकारून सरकारच्या विविध योजनेत सहभागी होण्याची व राष्ट्र निर्माण कार्यात योगदान देण्याची सुवर्ण संधी भारत सरकार द्वारा देण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक करिता 1 एप्रिल 2021 ला शैक्षणिक पात्रता दहावी पास व वयोमर्यादा 29 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची निवड करताना अमरावती जिल्ह्यातील गैर विद्यार्थी असणाऱ्यांच्या प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे. त्यांना मासिक मानधन रुपये 5000/- दिल्या जाणार आहे. निवड झालेल्या युवा स्वयंसेवकांना साक्षरता, आरोग्य, लिंगभेद, राष्ट्रीय एकात्मता आदी सामाजिक क्षेत्रात कार्य करता येईल. राष्ट्रसेवा व समाजसेवा करण्याची इच्छा व जिद्द असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील युवक-युवती नेहरू युवा केंद्र संघटन च्या nyks.nic.in साइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख शनिवार दिनांक 20 फेब्रुवारी 2021 आहे. याच वेबसाईटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचण येत असल्यास नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह नेहरू युवा केंद्र, अल हबीब बिल्डिंग,बियाणी चौक ते सर्किट हाऊस रोड, अमरावती या पत्त्यावर अर्ज सादर करू शकतात. यापूर्वी ज्यांनी या योजनेत कार्य केले आहे, ते पुन्हा हे कार्य करू शकणार नाही. असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी कु. स्नेहल बासुतकर यांनी केले.