पोलीसांना आपले मित्र समजून सहकार्य करा ; कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

0
323
Google search engine
Google search engine
एसडीपीओ जाधव यांचे चांदूर रेल्वे उपविभागातील जनतेला आवाहन
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व पोलीसांना आपले मित्र समजून सहकार्य करा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी चांदूर रेल्वे उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना केले आहे.
यावेळी बोलतांना जितेंद्र जाधव म्हणाले की, सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी त्रिसूत्री चे पालन तंतोतंत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावे, हात स्वच्छ धुवावे व सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे आणि पोलिस प्रशासन व अन्य प्रशासन जे आवाहन करीत आहे त्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे  चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी उपविभागामध्ये येणाऱ्या चांदूर रेल्वे, तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर, कुऱ्हा, दत्तापूर, तिवसा या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोनासंबंधी शासकीय सर्व नियमांचे पालन करून सगळे मिळून कोरोनाला हरवायचे आहे व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना आपले मित्र समजून सहकार्य करावे असेही ते म्हणाले.