स्थानिक गुन्हे शाखेची व्हीडीओ गेम पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या जुगारावर धाड !

0
1674
Google search engine
Google search engine

दर्यापूर ( विषेश प्रतिनीधी ) स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण पोलिस स्टेशन दर्यापूर येथील पथक अवैध धंद्याविरुद्ध कारवाही करण्याकरीता प्रेट्रोलींग करीत असताना पोलिस स्टेशन दर्यापूर अंतर्गत आठवडी बाजार येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जॉकपॉट लॉटरीचा व्यवसाय सुरु असल्याचे गुप्त माहीती वरून सदर पथकाने धनलक्ष्मी व महालक्ष्मी व्हिडीओ पार्लर आठवडी बाजार दर्यापूर येथे घाड टाकून पाहणी केली असता , सदर ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मशीन वर अवैध रित्या जॅकपॉट लॉटरीचा व्यवसाय सुरु असल्याचे दिसुन आले . वरून स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिणचे पोलिस स्टेशन दर्यापूर पथकाने महालक्ष्मी व धनलक्ष्मी लॉटरी सेंटरमध्ये लॉटरी खेळणारे १). विजय रामराव बारब्दे वय ५१ वर्ष रा. दर्यापूर २). सुरेश जनार्धन तराळे वय ५० वर्ष रा. दर्यापूर ३). गोकूळ हरीभाऊ गावंडे वय ५१ वर्ष रा. हींगणी मिर्झापूर ४). निलेश लक्ष्मण इसोकार वय ३२ वर्ष रा. बनोसा ७). सदानंद गुलाबराव तळोकार वय ५० वर्ष रा . बनोसा यांना ताब्यात घेण्यात आले. सदर लॉटरी सेंटरमधून २८ नग इलेक्ट्रॉनिक मशिन पिसली कॉईन व नगदी १२,८०० रुपये असा एकून २,०८,८०० चा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना पुढील कारवारी करीता पोलिस स्टेशन दर्यापूर येथे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाही पोलिस अधिक्षक श्री एन बालाजी , अप्पर पोलिस अधिक्षक श्याम घुगे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री तपन कोल्हे ठाणेदार , पो.नि. प्रमेश अत्राम पोलिस स्टेशन दर्यापूर यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलिस उपनिरीक्षक प्रिया उमाळे सहाय्यक पो. ऊ. नि. संतोष मुंदाने , रविंद्र बावणे , पुरुषोत्तम बावणे , प्रशांत ढोके, बजरंग इंगळे, मंगेश अगळदे , दिनेश कनोजीया , पंकज फाटे , सागर नाथे यांनी केली आहे