कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमभंग करणा-यांवर 20 पथकांची नजर

0
1558
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 6 : संचारबंदीत शिथीलता आणल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी दुकानदार व नागरिकांकडून नियमांचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमभंग करणा-यांवर दंडात्मक कारवाईसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी शहरात परिसरनिहाय 20 विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्यात चार उपजिल्हाधिका-यांना प्रत्येकी पाच पथकांमागे एक याप्रमाणे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, प्रत्येक पथकात विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे.

या पथकांकडून सार्वजनिक स्थळी थुंकणा-यांना प्रथम आढळल्यास पाचशे रूपये दंड व दुस-यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न लावल्यास पाचशे रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. दुकानदार, भाजीविक्रेते यांनी 2 ग्राहकांमध्ये 3 फूट अंतर, मार्किंग न करणे आढळल्यास दुकानदाराला आठ हजार दंड व सोशल डिस्टन्स न पाळणा-या ग्राहकाकडूनही 300 रूपये दंड आकारण्यात येईल. किराणा दुकानदाराने वस्तूंचे दरपत्रक न लावल्याचे आढळल्यास 3 हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. या सर्व कृती दुस-यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. कार्यालय क्षेत्रात कार्यवाहीची जबाबदारी कार्यालयप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. या पथकांकडून सोमवारपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येईल.

कॉटन मार्केट, मोची गल्ली, भाजीबाजार

        उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले यांच्याकडे नियंत्रण अधिका-याची जबाबदारी आहे. त्याअंतर्गत अमरावती शहरात कोर्ट परिसरासाठी राज्य कर निरीक्षक आशिष तिवारी, स्वाथ्य निरीक्षक दीपक सांगले, एएसआय अशोक गिरी, गाडगेबाबा मंदिर रस्ता परिसरासाठी तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, स्वास्थ निरीक्षक आदेश वानखडे, पोलीस कर्मचारी दिगंबर चोरपगार, भाजीबाजारासाठी सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, स्वास्थ निरीक्षक छोटू पटेल, पोलीस कर्मचारी दिगंबर इंगळे, मोची गल्ली परिसरासाठी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, स्वास्थ निरीक्षक अनुपकांत पाटणे, पोलीस कर्मचारी संजय नेहाटे, कॉटन मार्केटसाठी सहायक समाजकल्याण उपायुक्त मंगला मून, स्वास्थ निरीक्षक एन. के. गोहर, पोलीस कर्मचारी दिनेश म्हाला यांची नेमणूक आहे.

                                    रूक्मिणीनगर, इतवारा, जवाहरगेट

उपजिल्हाधिकारी वर्षा पवार या नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पाहतील. त्याअंतर्गत दस्तुरनगरसाठी रोजगार व कौशल्यविकास सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, पोलीस कर्मचारी सुरेश चव्हाण, रुक्मिणीनगरसाठी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र गुठळे, स्वास्थ निरीक्षक मनीष हडाले, पोलीस कर्मचारी महेंद्र ठाकूर, इतवारा बाजारासाठी जलसंधारण विभागाचे महेश निपाणे, स्वाथ्य निरीक्षक दिनेश निंधाणे, पोलीस कर्मचारी अनिल बागडे, जवाहरगेट ते सराफा लाईनसाठी उद्योग निरीक्षक जी. बी. सांगळे, स्वास्थ निरीक्षक धर्मेंद्र डिक्के, पोलीस कर्मचारी वसंत धोटे, गुलशन मार्केट परिसरासाठी वरिष्ठ भूजल सर्वेक्षण भूवैज्ञानिक संजय कराड, स्वास्थ निरीक्षक एस. के. डोंगरे, पोलीस कर्मचारी रामदास जोंधळे यांचा पथकात समावेश आहे.

                                    मालटेकडी, नवाथे चौक आदी परिसर

उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याकडे नियंत्रण अधिका-याची जबाबदारी आहे. त्याअंतर्गत जवाहररोडसाठी सहायक नगररचना संचालक दिनेश वाघाडे, स्वास्थ निरीक्षक मोहित जाधव, पोलीस कर्मचारी नरसिंग पवार, रवीनगरसाठी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, स्वास्थ निरीक्षक विलास डेंडुले, पोलीस कर्मचारी आशिष कावरे, गांधी चौकासाठी उद्योग निरीक्षक ए. एन. इंगळे, स्वास्थ निरीक्षक महेश पळसकर, पोलीस कर्मचारी दीपाली कारमोरे, मालटेकडी परिसरासाठी सहायक नगररचनाकार श्रीकांत पेटकर, स्वाथ्य निरीक्षक सय्यद हक, पोलीस कर्मचारी जयसिंह ठाकूर, नवाथे चौकासाठी पाटबंधारे अभियंता ज. श. दारोडे, स्वास्थ निरीक्षक प्रसाद कुलकर्णी व पोलीस कर्मचारी प्रियांका तिखिले यांची नेमणूक आहे.

                                    जयस्तंभ, राजकमल, इर्विन चौक  

            उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्याअंतर्गत जयस्तंभ चौकासाठी नगररचनाकार रणजीतसिंह तनपुरे, स्वास्थ निरीक्षक पंकज तट्टे, पोलीस कर्मचारी सरला खवले, राजकमल चौकासाठी वस्तू व सेवा कर निरीक्षक सागर मोटघरे, स्वास्थ निरीक्षक व्ही. जी. टांक, पोलीस कर्मचारी श्वेता गुळकरी, इर्विन चौकासाठी वस्तू व सेवा कर निरीक्षक रितेश पिल्ले, स्वास्थ निरीक्षक प्रशांत गावनेर, पोलीस कर्मचारी संध्या नेहारे, मालटेकडी परिसरासाठी वस्तू व सेवा कर निरीक्षक राजेश राऊत, स्वास्थ निरीक्षक एस. डी. चोरपगार, पोलीस कर्मचारी संगीता आखरे, पंचवटी चौकासाठी वस्तू व सेवा कर निरीक्षक मंगेश भोनखाडे, स्वास्थ निरीक्षक रोहित हडाले, पोलीस कर्मचारी ज्योती खवले यांचा पथकात समावेश आहे.