*घरेलु कामगारांच्या कल्याणासाठी 250 कोटींची तरतूद* *कल्याणकारी योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी* – *राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू*

0
1353
Google search engine
Google search engine

 

मुंबई,ता. ९ – राज्यातील असंघटीत क्षेत्रात कार्यरत घर कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांसाठी सुमारे 250 कोटी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नातून
घरेलु कामगारांसाठी मोठी तरतूद झाली आहे.

घरकामगार विशेषतः महिला कामगार भगिनींना याचा लाभ होणार आहे. घरेलु कामगारांना श्रमापोटी तुटपुंज्या उत्पन्न मिळते. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा होतो. मुलांना चांगले शिक्षण व कुटूंबातील एखाद्याच्या आजारपणासाठी पैसाही अनेकदा नसतो. हे लक्षात घेऊन कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी पदभार स्विकारताच सर्वप्रथम असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांना हात घातला व आतापर्यंत कित्येक वर्षांपासून केवळ कागदांवरच असलेल्या योजना घरेलु कामगारांसाठी प्रत्यक्षात उतरविण्याच्या हालचालींना वेग दिला.

घरेलू कामगार कल्याण मंडळाला निधीअभावी त्यांच्या विविध कल्याणकारी योजना राबवणे शक्य होत नव्हते. त्यादृष्टीने मंडळाचे सक्षमीकरण करणे, निधी उपलब्धतेबाबत योजना तयार करणे याकरिता कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी मंडळाचे विकास आयुक्त तथा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची गत 16 डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली तसेच त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. त्याची फलनिष्पत्ती म्हणून आज बजेट मध्ये 250 कोटी रुपयाचा निधी घरेलू कामगार कल्याण मंडळास उपलब्ध झाला आहे . त्यानुसार आता घरेलु कामगारांना योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वप्रथम त्यांची नोंदणी केली जात आहे.

राज्यातील तालुका,जिल्हा व महापालिका हद्दीत सुमारे 50 लाख घरेलु कामगार कार्यरत आहेत. या कामगारांचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास ,अपघाताचा मृत्यु झाल्यास ,कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास व अंशतः अपंगत्व आल्यास त्यांना मदत दिले जाणार आहेत. तसेच शिक्षा सहयोग योजनेंतर्गत ईयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या पाल्यांना व आयटीआय करणाऱ्या मुलांना दर तिमाहीला मदत दिले जाणार आहेत. 60 वर्ष पूर्ण झालेल्या घरेलु कामगारांना पेन्शन, प्रधानमंत्री सुरक्षा व प्रधानमंत्री जिवन ज्योती विम्याचा लाभ देखील दिल्या जाणार आहे. सोबतच 18 ते 40 वयोगटातील युवकांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन योजना राबविली जाणार असुन लाभार्थिचा मृत्यु झाल्यास अंत्यविधीचा खर्च देखील दिल्या जाणार आहे.घरेलु कामगारांना त्यांच्या श्रमाचे पुरेसे मोल मिळत नसले तरी समाजातील एक प्रमुख घटक म्हणून यापुढे त्यांनाही मानसन्मान मिळावा व त्यांच्या कुटूंबियांचाही उदरनिर्वाह चांगला चालावा हाच या योजने मागचा हेतु आहे.त्यामुळे या योजना त्वरीतृ लागु करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहीती कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिली.
०००