जागतिक महिला दिन कडेगांव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे संपन्न कोवीडयोध्दा महीलांचा केला सत्कार.

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्यूज

सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस मालनताई मोहीते यांनी देवराष्ट्रे येथे महीलादिनाच्या निमित्ताने महीलासाठी घेतलेल्या कार्यक्रमात ज्या महिलांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केली त्या ‘कोविड योध्दा ‘ महिलांचा सत्कार करण्यात आला.
त्या अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स, मदतनीस, आरोग्य सेविका यांचा शाल व श्रीफळ ,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन – माजी जि.प.अध्यक्ष व सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सौ. मालनताई मोहीते होत्या.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई महिंद – तसेच डॉ.स्नेहल शिंदे , सभापती शोभाताई होनमाने ,गुंजनाताई मिसाळ सुपरवायझर- शबाना आगा यांनी आपले विचार मांडले .
या कार्यक्रमात बोलताना मालनताई मोहीते म्हणाल्या की, महिलांनी चूल आणि मूल यातच न राहता सामाजिक, राजकीय क्षेत्रात सहभागी व्हावे. महिला आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज महिला सरपंच, पंचायत.समिती सदस्य, जिल्हा.परिषद.सदस्य, आमदार, खासदार, व मंत्री म्हणून काम करत आहेत. महिलांनी अशीच आपल्या स्वबळवर भरारी घ्यावी. हिच जिल्ह्यातील व कडेगांव तालुक्यातील तमाम महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.