नागरीकांनी शासनाची मोफत कोरोनाची लस टोचून घ्यावी* *पाणी संघर्ष समिती चे आवाहन*सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख.

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज

कडेगाव तालुक्यात कोरोना ची लस आली आहे, परंतु बऱ्याच नागरिकांना त्याची माहिती नाही. कोरोनाची लस टोचून घ्यावी असे आवाहन पाणी संघर्ष समिती कडेगाव चे सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख व अभिमन्यू वरुडे यांनी केले आहे.
कोरोनाची लस वय वर्ष 60 पासून पुढे असलेल्या नागरिकांनी कोरोना लस आधारकार्ड दाखवून मोफत टोचून घ्यावी .
कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी, मोहिते वडगाव , नेवरी,हिंगणगाव बुद्रुक या सरकारी दवाखान्यात सोमवारी बुधवारी व शुक्रवारी कोरोना लसीकरण सुरू आहे ,तसेच चिंचणी व कडेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची मोफत लस सोमवारी ते शनिवारी देणे सुरू आहे.
फ्रंट लाइन वर्कर्स, कोरोना योद्धे यांनाही मोफत लस देणे सुरू आहे.
तसेच वय वर्ष 45 ते वय वर्ष 59 पर्यंत ज्या लोकांना डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर ,दमा किंवा किडनी चा त्रास असेल त्यांनी कोरोनाची लस मोफत टोचून घ्यावी. त्यासाठी फक्त डॉक्टर यांची औषधे लिहून दिलेली चिठ्ठी किंवा त्या आजाराचे सर्टिफिकेट व आधार कार्ड दाखवून कोरोना लस टोचून घ्यावी .
लस सुरक्षित आहे,लसीचे दोन डोस असून दुसरा डोस 28 दिवसांनी घेणेचा आहे. कोरोनाची लस घेण्यापूर्वी तीन दिवस व लस घेतल्या नंतर तीन दिवस मद्यपान करू नये.
तरी कोरोना हद्दपार करण्यासाठी व भविष्यातील कोरोना दुसरी लाट टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोना ची लस घ्यावी असे आवाहन पाणी संघर्ष समिती तर्फे करण्यात आले आहे.
यावेळी इंजिनिअर ज्ञानेश्वर शिंदे , डॉ.सुरेश पाटील, कडेगांव तालुका पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष हिराजी देशमुख,पंकज महाडीक,आप्पासो चव्हाण यांचेसह व पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते, पत्रकार बंधू उपस्थित होते. यावेळी पत्रकार हेमंत व्यास, पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आप्पासाहेब यादव, मोहन जाधव, दत्तात्रय देसाई इत्यादी कार्यकर्ते यांनी लसीकरण करून घेतले.कडेगाव ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कुभार पी. आर,साळी पी. ओ, दबडे ए. ए. यांनी पाणी संघर्ष समिती व पत्रकार यांना कोविडची लस देण्यात आली. एकुण ४० महीला व पुरूषांनी लसीकरणाचा लाभ घेतला.यावेळी
कडेगांव ग्रामिण रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.