मार्शल आर्ट पिंच्याक सिल्याट खेळाडूंचे गुरुवंदन हॉस्पिटल येथे मोफत हेल्थ चेकअप

0
1233
Google search engine
Google search engine

आकोटः

शहरातील जिजामाता चौक येथिल गुरुवंदन हॉस्पिटलमध्ये मध्ये मार्शल आर्ट पीच्यांक सिल्याट खेळाडूंसाठी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प पार पडला.
कोरोना काळामुळे विद्यार्थी व खेळाडू फक्त ऑनलाईन शिक्षण घेत आहेत मोबाईल, टीव्ही मुळे शारीरिक हालचाल तथा खाण्या-पिण्या मध्ये पण खूप बदल होत असल्याने खेळाडूंसाठी ही मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.शहरातील डॉ धर्मपाल चिंचोळकर यांच्या गुरुवंदन हॉस्पिटलमध्ये सर्व खेळाडू चे हेल्थ चेकअप करण्यात आले आहे.डॉ धर्मपाल चिंचोळकर यांनी सर्व खेळाडू ना त्यांच्या शारीरिक व्यायाम,त्यांचे डायट या सर्व विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले

. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीच्याक सिल्याट चे अध्यक्ष रवींद्र मालखेडे, प्रमुख उपस्थित कोशाध्यक्ष शरद हिंगणकर जिल्हा सचिव व मुख्य प्रशिक्षक आकाश धुमाळे,पत्रकार संतोष विणके आदींची उपस्थिती होती.यावेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व पिंच्याक सिल्याट चे दीपक सासणे,दीक्षा शेवाळे, चंद्रकांत लाटेकर, योगेश जोंधळे, आणि कांचन पंत या सर्वानी परिश्रम घेतले.