*”ग्रामीण पोलीस दलाच्या ‘रक्षादीप’ उपक्रमांतर्गत एकवीरा स्कुल ऑफ ब्रिल्लीयंट्स , दर्यापूरची देवश्री धांडे जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित”*.

0
550
Google search engine
Google search engine

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(महिला व बालकल्याण मंत्री, जिल्हाधिकारी, एसपी, पोलीस आयुक्त, आमदार यांच्या हस्ते स्वीकारला सत्कार).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दर्यापूर
*अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे रक्षादीप उपक्रमांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार व महिलांवरील अत्याचार या संवेदनशील विषयावर मागील कोवीड-१९ च्या संक्रमण काळात माहितीपट तयार करण्याचे काम सुरू होते व तो माहितीपट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या माहितीपटामध्ये श्री तुळशीदास व सौ प्रणिता धांडे यांची इयत्ता आठवी मध्ये एकविरा स्कुल ऑफ ब्रील्लीयंट्स,दर्यापूर येथे शिकत असलेली देवश्री धांडे हिने covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना ग्रामीण पोलीस दल अमरावतीला या माहितीपटासाठी आपला “आवाज” दिला. व तो यशस्वीरीत्या जिल्ह्यातील 23 शाळेतील वीस हजार विद्यार्थ्यांना वेबिनारद्वारे पोहोचविला. त्याबद्दल देवश्री धांडे चा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एस. पी. डॉ. हरी बालाजी व इतर मान्यवरांच्या हस्ते तिला प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आता हा माहितीपट संपूर्ण राज्यात शाळा, आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणी दाखविण्यात येणार आहे ,दर्यापुरच्या एकवीरा स्कुल मधील देवश्री धांडे चा आवाज राज्याच्या पोलीस यंत्रणेमार्फत राज्याच्या कानाकोप-यात पोहोचणार आहे. देवश्रीच्या या सन्मानाचे एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीयंट्स चे प्रिन्सिपल तुषार चव्हाण,शाळेचे विश्वस्त मंडळ अध्यक्षा- डॉ.अरुणा भट्टड, उपाध्यक्ष- डॉ.विष्णुजी भारंबे, सचिव- श्री.दिलीप पखान, सह-सचिव- सौ.पूनम पणपालिया, कोशाध्यक्ष -श्री.अतुल मेघे, सदस्य-श्री.वैभव मेघे व डॉ.उत्कर्ष भट्टड , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जिल्हा व तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी तिचे कौतुक केले आहे…*