आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे रोजगार सेवकांना दिलासा !  रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ !

0
2102
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे रोजगार सेवकांना दिलासा !
रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ !
रोजगार सेवकांना ६ टक्के पर्यंत मिळणार मानधन !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्रामीण रोजगार सेवकांना दिलासा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढ करावी अशी मागणी ग्राम विकास मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, नियोजन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून केली होती. अखेर आमदार देवेंद्र भुयार यांच्यामागणीला यश आले असून राज्य शासनाने रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. रोजगार सेवकांना प्रचलित पद्धतीनुसार एकूण कामानुसार ६ टक्केपर्यंत वाढ केली आहे.
       महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत निहाय एकूण निर्माण होणाऱ्या संचयित मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने प्रतिमा एकत्रित मानधन देण्याचा निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने ८ मार्चला घेतला आहे.  त्यानुसार वार्षिक व मासिक मानधन जाहीर करण्यात आले आहे. ७५०  मनुष्य दिवस निर्मिती झाल्यास प्रचलित पद्धतीनुसार ६ टक्के एकून कामाच्या मानधन दिले जाणार आहे. ७५१ ते १५००  दिवस निर्मिती झाल्यास वार्षिक २४००० तर मासिक २००० रुपये मानधन मिळणार आहे. १५०१ ते २५०० रुपये मनुष्य दिवस निर्मिती केल्यास वार्षिक ३६ हजार रुपये तर मासिक ३ हजार रुपये मानधन,  २५०१ ते ४ हजार  मनुष्य दिवसाची निर्मिती केल्यास वार्षिक ४२ हजार तर मासिक ३५०० हजार मानधन दिले जाणार आहे. ४००१ ते ५५०० मनुष्य दिवस निर्मिती झाल्यास वार्षिक मानधन, ४८ हजार तर मासिक ४  हजार, ५५०१ ते ७ हजार मनुष्य दिवसाची  निर्मिती झाल्यास वार्षिक ५४ हजार मानधन,  तर महिन्याकाठी ४५०० रुपये मानधन मिळणार आहे. ७००१ ते ८ हजार मनुष्य दिवसाची निर्मिती केल्यास वर्षाला ६० हजार तर महिन्याला ५ हजार मानधन मिळणार आहे. ८०९१ ते ९  हजार मनुष्य दिवसाची निर्मिती झाल्यास ६८४०० वार्षिक तर ५ हजार ७०० मानधन,  तर ९००१ ते  १० हजार मनुष्य दिवसाची निर्मिती केल्यास वार्षिक ७६८०० तर मासिक ६४०० रुपये मानधन मिळणार आहे. १० हजार मनुष्य दिवसाच्या पुढे प्रत्येक एक हजार मनुष्य दिवसापर्यंत ७०० रुपयांची वाढ करून गणना केली जाणार आहे.
     उपरोक्त मानधन वाढीबाबत नियोजन विभागाने आवश्यक त्या सूचना व नियम ८ मार्चच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसारच ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी १ हजार मनुष्य दिवस निर्मिती पर्यंत एकूण मजूरी प्रदाननानुसार केवळ २.२५ टक्के दिला जात होता. त्यात सुधारणा होऊन आता ६ टक्के मानधन वाढ करण्यात आली आहे.
मनुष्य दिवस निर्मिती नंतरच होणार फायदा !
ग्राम रोजगार सेवक मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेची कामे गावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्यानंतरच रोजगार सेवकांना मानधनवाढीचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू नाहीत अशा ठिकाणी मनुष्य निर्मिती होत होत नाही. त्यामुळे येथील रोजगार सेवकांना मानधन मिळत नाही. मात्र ज्या ठिकाणी रोहयोची कामे सुरू आहेत अशा ठिकाणी मनुष्य निर्मिती होते. त्यामुळे रोजगार सेवकांना मानधन मिळते. यापुढे मनुष्य दिवस निर्मिती प्रत्येक ठिकाणी तसेच मोठ्या प्रमाणावर केल्यास रोजगार सेवकांना मानधन वाढीचा फायदा होणार आहे.