जि. प. शिक्षण व बांधकाम सभापतीपदासाठी शनिवारी निवडणूक

0
637
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 13 : अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपद रिक्त झाल्याने निवडणूक येत्या शनिवारी (20 मार्च) होणार आहे.

            जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात 20 मार्चला सकाळी 11 वाजतापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक कार्यक्रमानुसार, शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. सभेचे कामकाज दुपारी 3 वाजता सुरू होईल व सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. छाननी संपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी 15 मिनीटांचा वेळ दिला जाईल. ही 15 मिनीटांची वेळ संपल्यावर उमेदवारी मागे घेतलेल्या व्यक्तींची व निवडणूक लढविणा-या उमेदवारांची वाचून दाखविण्यात येतील. त्यानंतर आवश्यकता भासल्यास तात्काळ मतदान, मतमोजणी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

            विशेष सभेच्या दरम्यान सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर व इतर दक्षतेचे पालन करणे आवश्यक असल्याचीही सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.