खासगी विनाअनुदानित शाळेत प्रवेशाच्या 25 टक्के जागा दुर्बल घटकांसाठी  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू –         शिक्षणाधिकारी ई. झेड. खान

0
1209
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 13 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांत 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार 244 शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. आता ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेलाही सुरुवात झाली असून, ती 21 मार्चपर्यंत चालेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान यांनी दिली.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रहिवास पुरावा, जात प्रमाणपत्र, दिव्यांग, एचआयव्हीबाधित किंवा प्रभावित असल्यास तसे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, घटस्फोटित महिला असल्यास न्यायालयाचा निर्णय व रहिवास आणि उत्पन्न दाखला, न्यायप्रविष्ट घटस्फोटप्रकरणी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, रहिवास व उत्पन्नाचा दाखला, विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यूपत्र, रहिवास व उत्पन्न दाखला, एकल पालकांसाठी आई किंवा वडील यापैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे, अनाथ बालक असल्यास अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. खान यांनी केले आहे.