पशुधन विकासासाठी वैरण बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
1174
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 13 : राष्ट्रीय पशुधन योजनेत विशेष घटक योजनेत 100 टक्के अनुदानावर प्रतिलाभार्थी पाच किलो वैरण बियाणे व 1 हजार दोनशे बहुवर्षीय वैरणीचे थोंबे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. यु. गोहोत्रे यांनी केले आहे.

            त्याचप्रमाणे, सर्वसाधारण योजनेत मूरघास निर्मितीसाठी लागणारे गवताचे गठ्ठे तयार करण्याचे यंत्र (सायलेज बेलर मशिन) प्रत्येक तालुक्यात वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीकडे संपर्क साधावा. या योजनेत गोशाळा, पांजरापोळ संस्था, बचत गटही अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय (0721-2662326) किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय (0721-2662066) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.