राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी *परिक्षेसाठी नियुक्त कर्मचा-यांना आरटीपीसीआर चाचणी ‘एमपीएससी’कडून बंधनकारक*

0
1375
Google search engine
Google search engine

 

*सर्व संबंधितांनी शुक्रवारीच चाचणी करून घ्यावी*

– *जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

अमरावती, दि. 18 : राज्य शासनाच्या विविध विभागातील गट अ व गट ब संवर्गातील पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (21 मार्च) राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व सर्व नियुक्त कर्मचा-यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे लोकसेवा आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचा-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चाचणी केंद्र सुरु करण्यात आले असून, सर्वांनी शुक्रवारीच चाचणी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.

परीक्षेसाठी नियुक्त सर्व कर्मचा-यांनी या चाचणी केंद्रावर वेळेत येऊन स्वॅब द्यावा व वेळीच अहवाल प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी संबंधितांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. एखाद्या कर्मचा-याच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या बदली वेळीच पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे व परीक्षा केंद्रावर अधिकारी व कर्मचा-यांचा पुरेसा स्टाफ उपलब्ध ठेवला जाईल. परीक्षा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

000