निर्मला ताई बांडे यांची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती जिंतूर महिला तालुकाध्यक्षपदी निवड

0
1895
Google search engine
Google search engine

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये जिंतुर जि.परभणी येथील सौ.निर्मला ताई बांडे यांची जिंतूर महिला तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.28/03/2021 रोजी संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने परभणी महिला जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई डोंगरे यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.


माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे