छावा क्रांतीवीर संघटनेच्या दर्यापूर तालुकाध्यक्षपदी विशाल बागडे

0
321
Google search engine
Google search engine

 

दर्यापूर(ता.प्रतिनिधी)-युवकांचे सामाजिक कार्यासाठी बिगर राजकीय संघटना असणाऱ्या छावा क्रांतीवीर संघटनेच्या दर्यापूर तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विशाल बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सूरज बाप्पू देशमुख यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून तालुक्यात परिचित असणारे तसेच नुकतेच निवडून आलेले नादरून ग्रामपंचायतचे सदस्य विशाल बागडे यांनी संघटनेचे सदस्य म्हणून आपल्या कार्याला सुरवात केली,त्याच्या सामाजिक कार्याची दखल घरून दर्यापूर तालुकाध्यक्ष पदावर त्याची नियुक्ती करण्यात असे जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख यांनी सांगितले. या नियुक्ती बद्दल सामाजिक कार्यकर्ते विशाल बागडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.