*शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या न. प.कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करा ; नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केली तहसीलदार यांचा कडे तक्रार*

0
752
Google search engine
Google search engine

 

*सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतांना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ होत आहे व्हायरल*

चांदूर बाजार नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी संतोष साहेबराव डोळे शासकीय कर्तव्यावर असताना सार्वजनिक ठिकाणी वीणा मास्क असल्याचे तसेच धूम्रपान करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करून कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याने त्याचे विरुद्ध त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याकरिता नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी चांदूर बाजार यांना लेखी तक्रारी द्वारे मागणी केली आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्याकरिता सर्व प्रशासकीय यंत्रणा व सर्वसामान्य जनता ही एकत्रित होवून लढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्या करीता अनेक शासकीय व खासगी रुग्णालयात सर्व वैद्यकीय यंत्रणा आपल्या स्वताच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटत आहे तसेच पोलिस कर्मचारी व शासनाच्या इतरही यंत्रणा ह्या सातत्याने आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावत असल्यानेच अनेक नागरिक हे सद्ध्या आप आपल्या घरात सुरक्षित आहेत. अश्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व वीणा मास्क आढळणाऱ्या नागरिकांना नगर पालिका, पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांच्या कडून दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. या दंडात्मक कारवाई मधून लाखोंचा महसूल शासनाला मिळाला आहे. तर दुसरीकडे शासनाच्या दिशानिर्देशाचे सक्तीने पालन व्हावे याकरिता चांदूर बाजार शहरातील नागरिकांना शिस्त लावण्याकरिता सक्ती करणारे नगर पालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारीच हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेला कर्मचारी संतोष साहेबराव डोळे हा शासकीय कर्तव्यावर असताना स्वतः विणामास्क असल्याचे व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे तसेच कोरोणा पसरविण्या करीता पोषक वातावरण तयार करीत असल्याचे एका व्हिडिओ च्या माध्यमातून समोर आलेले आहे ..? कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने तयार केलेल्या दिशानिर्देशाचे पालन व्हावे या करीता सर्वसामान्य नागरिकांना सक्ती करणारे तसेच गोर गरीब जनतेकडून दंड वसूल करणारे नगर पालिकेचे कर्मचारी च हे कारोनाचे सुपर स्प्रेडर चे काम करीत असल्याने जनते मधे फार मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत असल्याने याकरिता जबाबदार असणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी संतोष डोळे याच्या विरुद्ध सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये मास्कचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे,तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारी द्वारे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार तहसीलदार, ठाणेदार व मुख्याधिकारी यांना केली आहे.