*22 टन काळ्या गुळाचा मंगळवारी लिलाव*

0
775
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 28 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरूड येथील सीमा तपासणी नाका शाखेने एका गुन्ह्यात 22 टन 605 किलो काळा गुळ जप्त केला. आता वरूड न्यायालयाच्या आदेशानुसार त्याचा लिलाव होणार आहे.

हा काळा गुळ अबकारी विभागाच्या एम-1 व एम-2 अनुज्ञप्तीधारकांनाच लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. हा लिलाव वरुडमधील रवाळा येथील सीमा तपासणी नाका येथे दि. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता होईल. संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Photo – file