तरुणांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर जवळपास 3 महिने रक्तदान करता येणार नाही – महाराष्ट्रासाठी करा महारक्तदान :- सुरज भाऊ शेवलकर यांचे आवाहन

0
512
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

महाराष्ट्र शासन कडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येत्या 1 मे पासून १८ वर्षावरील तरुण पिढीला सुद्धा कोविड लसीकरण ची मोहीम हाती घेतली आहे लस घेतल्यानंतर जवळपास ५६ दिवस रक्तदान करता येणार नाही म्हणून जवळपास पुढचे २ महिने सर्विकडे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो म्हणूनच अमरावती जिल्हा थैलेसेमिया निर्मूलन समिती चांदुर बाजार तर्फे सर्व नागरिकांना व रक्तदात्यांना आवाहन करीत आहे तरुण वर्गातील नागरिकांनी लस घेण्याअगोदर आपल्या जवळच्या रक्तपेढी जाऊन रक्तदान करा तसेच आपआपल्या गावांमध्ये रक्तदान शिबीर घेऊन शासनाला सहकार्य करा व मगच लस घ्या जेणेकरून भविष्यात निर्माण होणारे संकट कमी व्हायला मदत होईल तसेच सध्या कोविड-१९ च्या रुग्णाला प्लाझ्मा ची खूप आवश्यकता आहे ज्या तरुनाला कोरोणा होऊन २८ दिवस पूर्ण झाले असतील त्यांनी अमरावती जिल्ह्यातील ( श्री बालाजी ब्लड बैंक, जिल्हा सामान्य रुग्णालयात इर्विन चौक व पंजाबराव देशमुख मेडिकल हॉस्पिटलमध्ये )जवळच्या रक्तपेढी मध्ये जाऊन प्लाझ्मा दान करा जेणेकरून ज्या कोरोणा ग्रस्त रुग्णाला तुम्ही प्लाझ्मा देणार त्या रुग्णाचे प्राण वाचणार सध्याची परिस्थिती पाहता सगळीकडे प्लाझ्मा ची खूप कमतरता भासत आहे आणि तुम्ही दर १८ दिवस नंतर पुन्हा प्लाझ्मा दान करू शकता या करिता कोरोणाला मात करून आलेल्या योद्धानी सामोरे या तसेच १८ च्या वर वयोगटातील तरुण जो कोणी इच्छुक रक्तदान करण्यास तयार आहेत त्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करा व प्लाझ्मा डोनेशन करून रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करावं असे आवाहन चांदुर बाजार चे रक्तमित्र सुरज भाऊ शेवलकर (Blood Workar) यांनी आवर्जून सर्व रक्तदात्यांना (नागरिकांना) व प्लाझ्मा डोनर यांना केले आहे