कोविड प्रतिबंधक लसीकरण :- जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त*

0
3515
Google search engine
Google search engine

कोविड प्रतिबंधक लसीकरण

*जिल्ह्यात ७ हजार ६०० डोस प्राप्त*

अमरावती, दि. १९ : जिल्ह्याला कोविड प्रतिबंधक लसीचे ७ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत.

कोविशील्ड ४ हजार ६०० व कोव्हक्सिन ३ हजार अशी एकूण ७ हजार ६०० लस जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.

यापूर्वी लसीकरणाची एक मात्रा घेतलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
०००