७ ते ११ दरम्यान जीवनावश्यक वस्तू दुकाने खुली , ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करू शकतील *ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर, मास्कचा अवलंब काटेकोरपणे करावा* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

0
3575
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २२ : जिल्हा प्रशासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या वेळेत ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करू शकतील. मात्र, सोशल डिस्टन्स, मास्क आदी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. दुकानदारांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी याच वेळेत जीवनावश्यक वस्तू दुकानांनी होम डिलीव्हरी पद्धतीचाही अवलंब करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*मद्यगृहे, मद्य दुकाने व बार यांना ७ ते ११ या वेळेत केवळ घरपोच सेवा पुरविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.* तिथे ग्राहकाला जाऊन खरेदी करता येणार नाही.
०००