पुंडा नंदीग्रामच्या वृक्षमित्र परीवाराने वृक्षलागवडीतुन उभारला हरीतपट्टा

0
989
इवलेसे रोप लवियले दारी…त्याचा वेलु गेला गगणावरी!
अकोट:(संतोष विणके )तालुक्यातील नंदीग्राम पुंडा येथे वृक्षमित्र परीवाराने वृक्षलागवडीतुन हरीतपट्टा निर्माण केला असुन वृक्ष संगोपनातुन रस्त्याच्या दुतर्फा हीरवळ निर्माण केली आहे. त्यामुळे नंदीग्राममध्ये इवलेसे रोप लवियले दारी…त्याचा वेलु गेला गगणावरी या म्हणीची प्रचिती येत आहे.! २०१७ साली पाणी फाऊंडेशन स्पर्ध अंतर्गत दुष्काळावर मात करण्याचा संकल्प करत गांवकरी मंडळींनी प्रयत्न केले.तर तरुणांनी वृक्षसंवर्धन संगोपनाचा निश्चय केला होता. त्याकरता गावातील तरुणांनी एकत्र येत पुंडा नंदीग्राम वृक्षमित्र परिवाराची स्थापना करत वृक्ष संगोपन वृक्ष लागवडीसाठी दिवसरात्र एक केला.त्यास गावातील अनेकांनी तसेच गावापासून दूर असणाऱ्यांनाही तन-मन-धनाने मदत करून वृक्ष चळवळीसाठी भरघोस पाठिंबा दिला तर वृक्षमित्र परिवाराच्या माध्यमातून तरुणाईने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.
.सर्वांच्या सहकार्याने वृक्षमित्र परिवाराच्या माध्यमातून नंदीग्राम वासीयांनी वृक्षलागवडीतुन निसर्गाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असुन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांपासून मिळणारा ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित होत असल्याने नंदिग्राम ग्रामस्थांच्या वृक्षलागवडीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.