पुरवठा निरीक्षक सहित तांत्रिक सहायक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ; चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता मागितली लाच

0
1705
Google search engine
Google search engine

 

अमरावती:-

 

आदरणीय महोदय
*यशस्वी सापळा कारवाई*
▶ *घटक* – अमरावती

▶ *तक्रारदार* – महिला (शासकिय नोकरदार), वय 28 वर्ष रा. अमरावती.

▶ *आलोसे* –
1) श्री.नारायण जयवंत चव्हाण,वय 29 वर्ष, पद – अव्वल कारकुन/पुरवठा निरिक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय,अमरावती
2) श्री.अविनाश अनंत भगत,वय 29 वर्ष, पद – तांत्रिक सहायक (कंत्राटी), जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती.
▶ *लाच मागणी रक्कम* – 50,000/- रूपये
पडताळणी दरम्यान पहिला हफ्ता लाच मागणी म्हणुन 40,000/- रू.

▶ *स्वीकारलेली लाच रक्कम* – 40,000/- रुपये.
▶ *पडताळणी* –
दि. 30/06/2021.
➡ *सापळा कारवाई* –
दि.30/06/2021.
▶ **घटना स्थळ* –
डी – मार्ट चे मुख्य पार्किंग समोरील बाजुस, बियाणी चौक कॅम्प अमरावती.

▶ *कारण* – तक्रारदार महिला शासकीय कर्मचारी असून त्यांनी दि.29.06.2021 रोजी तक्रार दिली की, त्यांचेविरुद्ध एका शासकीय रास्त दुकानदार यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती येथे होत असलेल्या चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता संबधीत काम पाहणारे अव्वल कारकुन श्री. चव्हाण हे 50,000 रुपये लाचेची मागणी करीत आहे.वरून आज दि.30.06.2021 रोजी पंचासमक्ष आ.लो.से. श्री.चव्हाण यांनी पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार महिला यांना त्यांचे विरुध्द होत असलेल्या चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता( न करण्याकरीता) 50,000/- रुपये लाचेची मागणी करून पहिले तात्काळ 40,000/- रूपये स्वीकारण्याचे मान्य करून रक्कम जमल्यास त्यांचेसोबत असलेले आ.लो.से.क्रमांक 2.श्री.अविनाश भगत यांना फोन करून लाच रक्कम त्यांचेकडे देण्यास सांगितली.त्यानंतर आजच सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष आलोसे क्र.1 श्री.चव्हाण यांचेवतीने आलोसे क्र.2 श्री.भगत यांनी 40,000/- रूपये लाच रक्कम तक्रारदार महीला यांचेकडून पंचासमक्ष स्वीकारली.वरून दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील कारवाई सुरू आहे.

*मार्गदर्शन* –
▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री.अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री. गजानन पडघन, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वी. अमरावती.

▶️ *सापळा व तपास अधिकारी* – श्री.राहुल वसंतराव तसरे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वी.अमरावती.
▶ *सापळा कारवाई पथक* –
श्री. राहुल तसरे ,पोलिस निरिक्षक,
ना.पो.शी विनोद कुंजाम ,
पो.शी सुनील जायेभाये ,
पो.शी.उपेंद्र थोरात.

▶ *आलोसे क्र.1 यांचे सक्षम अधिकारी* मा. उपआयुक्त , पुरवठा आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग.अमरावती
———————————–
*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस निरीक्षक राहुल तसरे,मो. नं.8805163100.
*@दुरध्वनी क्रं – 0721-2552355, 2553055
*@टोल फ्रि क्रं 1064*
—————————————-