पोलिसाला हातात पिस्तुल घेऊन इंस्टाग्राम वर रिल्स बनवणे पडले महागात – पोलीस अधीक्षक यांनी केले महेश काळे यांना निलंबित

0
4680
Google search engine
Google search engine

अमरावती –

पोलिस शिपाई ब.न.2413 महेश मुरलीधर काळे नेमणूक पो.स्टे.चांदुर बाजार ,यांनी शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्टलसारख्या शस्ञाचा वापर करून व्हिडीओ तयार केला .सदरचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल केला .तसेच शासकीय गणवेशाचा व शस्ञाचा चुकीचा गैरउपयोग केल्याचे बेशिस्त व बेजबाबदार वर्तनाबदल नमुद पोलिस अमलदार यास मा.पोलिस अधिक्षक सा.अमरावती ग्रामीण यांनी निलंबीत केले आहे .

सदर पोलीस शिपाई यांचे मोठ्या प्रमाणात विडिओ इन्स्टाग्राम वर पोस्ट होत होते परंतु आता कारवाई झाल्यानंतर त्यांनी ते विडिओ आपल्या खात्यातून डिलीट केलेले आहेत