*हॉटेल व्यावसायीकांनी मानले आ. सुलभाताई संजय खोडके यांचे आभार ; खोडके दम्पत्तीनी लावून धरली होती असोसिएशनची मागणी*

0
808
Google search engine
Google search engine

*अमरावती १३ ऑगस्ट* : राज्यातील बार , हॉटेल ,व रेस्टारंटच्या व्यवसायाला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहणार असल्याचा निर्णय नुकताच महाराष्ट शासनाने जारी केला आहे. या संदर्भात अमरावतीच्या आ . सौ . सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने हॉटेल व्यावसायीक व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार वर्गाला दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील निवेदन व आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग दर्शवून खोडके दम्पत्तीनी शासनाकडे मागणी रेटून धरीत निकाली काढल्याबद्दल अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशन व अमरावती वाईन -बार असोशिएशनच्या वतीने आ. सुलभाताई खोडके व यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असतांना अनेक व्यापारी आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती . मात्र बार , हॉटेल , रेस्टारेंट व्यवसायाला दुपारी चार वाजे पर्यंत व शनिवार , रविवार संपूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले,या आदेशामुळे हॉटेल , बार व रेस्टारंट व्यावसायिकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली . दरम्यान असोशियनच्या वतीने आ. सुलभाताई खोडके व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांची भेट घेऊन कैफियत मांडण्यात आली .
हॉटेल अँड लॉजिंग व्यवसायाचे अर्थचक्र पूर्वपदावर आणण्यासाठी बार , रेस्टारंट व हॉटेल व्यवसाय रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी व या घटनांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करावा अशी विनंतीपूर्वक मागणी आमदार महोदयांनी मुख्यमंत्रीमहोदय व उपमुख्यमंत्री महोदयांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली. अशातच बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना . अजितदादा पवार यांची भेट घेतली व जिल्ह्यातील बार , रेस्टारंट व हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरु होण्याकरिता त्यांच्या वेळा दुपारी ४ ऐवजी रात्री ११ पर्यंत वाढवून देण्यात यावी व या व्यवसायाला व यावर अवलंबून असणाऱ्या घटकाला दिलासा मिळावा , या संदर्भात चर्चा केली. या अनुषंगाने राज्य सरकारने हॉटेल , बार व रेस्टारंटची वेळ ही रात्री दहा वाजेपर्यंत वाढवून दिली आहे . यानिमित्त अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशनच्या वतीने मा. आमदार सौ. सुलभाताई खोडके तसेच संजय खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच सहकार्याबद्दल कृतज्ञता पत्र देण्यात आले. यावेळी अमरावती रेस्टारेंट अँड लॉगिंग असोशिएशनचे अध्यक्ष रवींद्रसिंग सलुजा , सचिव सारंग राऊत , मनोज जयस्वाल , आबिद हुसेन ,अमित कुकरेजा , समीर देशमुख , सचिन जयस्वाल , अखिलेश राठी , शक्ती राठोड , पियुष राठी , चिराग दोषी , अक्षय ढोके , सुमित शर्मा , माजी नगरसेवक लकी नंदा , प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे , गजाजन राजगुरे , अखिल चांडक , उदय बुब , सरबजीत सलुजा , समीर कुबडे , दिनेशखत्री , प्रतीक सोळंके , प्रवेश खंडेलवाल , जितेन लाठिया , दिलीप बागडे, प्रकल्प चांडक , हर्ष केशरवाणी , रोहित शर्मा , रोहन गणेडीवाल , अमित तरडेजा , शेख जाकीर शेख नसीर , श्रीजीत पाटील , गौरव खत्री , रुपेश डाफ़े , विजेंद्र पाटील , सुभाष पनपालिया, मोहमद रिजवान मन्सुरी , राजेंद्र नेभनानी , सुनील महल्ले , नितीन माहोरे , पप्पू काळे , अमित सावरकर , तसेच अमरावती वाईन -बार असोशिएशनचे गजानन राजगुरे , सुरेश चांदवाणी , नितीन देशमुख , शशी रत्नानी , जस्सी नंदा , शहाडे , अंकित राजगुरे , नितीन गुडधे, मदन जयस्वाल , सागर शिरभाते , आदींसह बार , रेस्टारंट व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते .