*मेळघाटमधील अतिदुर्गम गोरगरीब आदिवासी भागात, श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी यांचे मदतीचे कार्य सातत्याने सुरु*

0
387
Google search engine
Google search engine

 

मेळघाट :-

 


कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या विचारांना जपत खऱ्या अर्थाने गोर-गरीब जनता,जनार्दनाची सेवा म्हणुन श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी. व श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मुर्तिजापुर. यांच्या वतीने मा.संचालक श्री.बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात श्री बाबांच्या प्रतिरुप सेवार्थ प्रचार वाहनातून, मेळघाटमधील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम भाग माळीझडप व नवलगाव या गावी अद्याप येण्या-जाण्या करीता जवळपास 25-30 किलो मिटर पर्यंत रस्ताच नाही,रस्त्याच्या दोन्ही बाजुला घनदाट स्वरुपाचे जंगल असुन प्राण्यांचा वावर आहे. लाईन नाही,तसेच भौतिक सोयी सुविधांचा अभाव असलेल्या अशा कठीन परिस्थितीत वास्तव्याला असणाऱ्या गोरगरीब, आदिवासी, वनवासी, बांधवांना मदतीचा एक हात म्हणुन श्री गाडगेबाबांचे परम भक्त श्री.संतोषकुमारजी झुनझुनवाला. व सौ.सितादेवी संतोषकुमारजी झुनझुनवाला मुंबई. यांचे सौजन्याने धान्य किराणा किट यामध्ये (1 किलो साखर, 1 किलो शुध्द खाण्याचे तेल,1 किलो तुर दाळ,3 किलो तांदुळ,1 किलो मिठ, 5 किलो शिदा आटा ) सोबतच ब्लॅंकेट, पुरुषांना शर्ट-पॅन्ट पिस,महिलांना साड्या,मुलांकरीता टुथ ब्रश, मिष्टान्न मोतीचूर लाडु, बिस्कीट,चॉकलेट,ईतर काही जिवनावश्य साहित्यांचे श्री.धर्माळे साहेब ( शिक्षण विस्तार अधिकारी ए.आ.वि.प्र.धारणी ) यांचे शुभहस्ते मोफत वाटप करण्यात आले.तसेच या आनंदमय प्रसंगी श्री.योगेशजी देशमुख ( अभियंता ) यांनी माळीझडप येथे गोरगरीब आदिवासी मुलांसमवेत आपला वाढदिवस साजरा करत खऱ्या अर्थाने समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला.तसेच मेळघाटातील सातत्याने सुरु असलेल्या मोफत वाटपाच्या उपक्रमाकरीता श्री.ऋत्विकभाऊ देशमुख ( अभियंता ) पुणे व श्री.मनिषभाऊ भुतडा अकोला यांनी देणगी स्वरुपात मदत देखील केली.त्याचबरोबर जिवनावश्यक साहित्य मोफत वाटप या कार्यक्रमाच्या माध्यामातुन माळीझडप व नवलगाव येथील आदिवासी बांधव आनंदित झाले.तसेच मा.संचालक श्री बापुसाहेब देशमुख यांना माळीझडप येथिल ग्रामवासी यांच्या समस्या देखिल जाणून घेतल्या, प्रामुख्याने गावासाठी लागणारा रस्ता लोकप्रतिनीधी व शासनाच्या माध्यमातुन हि समस्या लवकरच दुर करु असे आवाहन देखील केले.गावच्या सरपंच तुलसी मॅडम व पोलीस पाटील श्री किशोर बेढेकर यांनी मा.संचालक श्री.बापुसाहेब देशमुख यांचे आभार मानले.श्री.गाडगेबाबांचे निष्कामसेवक असलेले श्री.बापुसाहेब देशमुख गोरगरीब आदिवासी बांधवांनकरीता देवदूत म्हणुन सातत्याने करत असलेले मदतीचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार (शिक्षण विस्तार अधिकारी ए.आ.वि.प्र.का.धारणी ) श्री.धर्माळे साहेब यांनी या प्रसंगी काढले.
तसेच या जिवनावश्यक साहित्य मोफत वाटपाच्या कार्यक्रमाकरीता श्री.सागरभाऊ देशमुख.श्री.प्रकाशभाऊ महात्मे ( व्यवस्थापक श्री.गाडगे महाराज समाधी स्थळ अमरावती ) श्री.अतुल भरतराव रेळे (श्री बाबांच्या प्रतिरुप सेवार्थ प्रचार वाहनाचे चालक )श्री.हरीभाऊजी मोगरकर.श्री.विठ्ठलराव तेलमोरे तसेच श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथिल मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व श्री बाबांची सेवक मंडळी उपस्थीत होती.